न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- लघुउद्योजक व छोट्या व्यावसायिकांना कमी मनुष्यबळात अनेक कामे करुन घ्यावी लागतात. लघुउद्योजक, स्टार्टअप, एमएसएमई यांना स्वतंत्रपणे पुर्णवेळ अकाऊंटंट, कार्यालयीन सहाय्यक, सचिव या कामांसाठी कर्मचारी नेमणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. ही सर्व कामे एकाच व्यक्तीकडून व्हावीत यासाठी त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शनाची गरज पडते. ही गरज ओळखून इन्स्टिट्युट ऑफ टॅक्सेशन, अकाऊंटींग ॲण्ड ॲडव्हर्रटायझिंग (ITAA) या संस्थेने सुरु केलेल्या प्रशिक्षण वर्गाचा या सर्व आस्थापना तसेच कर्मचा-यांना व सुशिक्षित बेरोजगारांना उपयोग होईल असे मत पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष गोविंद पानसरे यांनी व्यक्त केले.
पुणे नाशिक महामार्गावर पांजरपोळ समोर भोसरी येथे इंन्स्टिट्युट ऑफ टॅक्सेशन, अकाऊंटींग ॲण्ड ॲडव्हर्रटायझिंग (ITAA) या संस्थेचे उद्घाटन नुकतेच पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोककुमार पगारिया, संतोष संचेती, विरेंद्रसिंग राठोड, आयटाचे संस्थापक संपादक राजेश जाधव, समिर बेर्डे, भोसरी शाखेचे संचालक डॉ. प्रशांत गदिया, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष मुकूंद आवटे, मुरलिधर साठे, डॉ. अणू गायकवाड, डॉ. ललितकुमार धोका, संजय आहेर आदी उपस्थित होते.
संचालक अमित कटारिया यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितले की, टॅक्सेशन, अकाऊंटींग ॲण्ड ॲडव्हर्रटायझिंग या क्षेत्रात मार्गदर्शन करणारी ‘आयटा’ हि नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या देशभरात सोळा शाखा आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील लघुउद्योजकांना, छोट्या व्यवसायिकांना, स्टार्टअपना कमी खर्चात, कमी वेळेत अनेक कामे करणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे काम आयटा ही संस्था करणार आहे. हि संस्था बारावी व पदवीधर झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी तसेच विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांसाठी आठ दिवसांपासून ते चार महिन्यांपर्यंतचे पुर्णवेळ व अर्धवेळ प्रशिक्षण वर्ग माफक फी मध्ये सुरु करीत आहे. येथे जीएसटी, खरेदी, विक्री, वितरण, उत्पादन यांचे अकाऊंटींग, डीजीटल मार्केटिंगचे लेखा परिक्षण कसे करावे यासाठी आणि अकाऊंटंट, कार्यालयीन सहाय्यक, सचिव पदांवर काम करण्यासाठी प्रशिक्षित व नामांकित सनदी लेखापालांकडून (सीए) मार्गदर्शन करण्यात येतील. या प्रशिक्षणाचा सुशिक्षित बेरोजगारांना उपयोग होईल व विविध आस्थापनांनादेखील प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. अशी माहिती अमित कटारिया यांनी दिली.
सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले व आभार अमरीश बोरा यांनी मानले.