न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सुधारित रेड झोन हद्दीमुळे बाधित क्षेत्रामधील नव्याने निर्माण होत असलेल्या अनधिकृत उपविभागणी / अनधिकृत बांधकामांवरील कारवाई बाबत महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे यापूर्वी वेळोवेळी देण्यात आलेल्या जाहीर निवेदनानुसार संरक्षण विभागाच्या सुधारित रेड झोन हद्दीने बाधित भूखंडावर नव्याने निर्माण होणाऱ्या अनधिकृत उपविभागणी व नव्याने निर्माण होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत जागरुकता निर्माण करणेसाठी सर्वसामान्य नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे. परिणामी सदरच्या रेडझोन बाधित क्षेत्रामधील नव्याने निर्माण होणाऱ्या अनधिकृत भुखंडाचे व नव्याने निर्माण होणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे प्रमाण काही अंशी कमी झालेचे माहितीस येते. परंतु, अद्यापही रेड झोन बाधित क्षेत्रामध्ये काही ठिकाणी नव्याने अनधिकृत बांधकामे / भूखंड उपविभागणी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे व त्यासदंर्भात काही तक्रारी पिं . चिं . म . न . पा . कडे प्राप्त झालेल्या आहेत.
सदरच्या रेडझोनमुळे बाधित भूखंडांवर पिं. चिं. म. न. पा तर्फे कोणतीही बांधकाम परवानगी देता येत नाही. परिणामी सदरच्या भूखंडाचे पर्यावसन नव्याने निर्माण होणाऱ्या अनाधिकृत बांधकामांमधे होण्याची व अशी नव्याने निर्माण झालेली अनाधिकृत बांधकामे सर्वसामान्य नागरिकांना फसवणुक करुन विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर रेडझोन बाधित भूखंडावर नव्याने निर्माण होणा-या अनधिकृत बांधकामांना आळा घालणे गरजेचे आहे. तरी, सदर प्रकरणी सर्वसामान्य जनतेची संभाव्य फसवणुक टाळणेकामी सर्व विभागांना सदरच्या रेड झोन बाधित भूखंडावरील नव्याने निर्माण होत असलेल्या अनधिकृत बांधकामांना कोणत्याही स्वरुपाची सार्वजनिक सोयीसुविधा (उदा. सार्वजनिक रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा जल:निसारण, वृक्षसुशोभीकरण, आरोग्यविषयक सेवा, कचरा संकलन) पुरविली जाणार नाही. याची दक्षता घेणेकामी कळविले आहे.
तसेच सदरच्या नव्याने निर्माण होत असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी अनाधिकृतरित्या घेतलेल्या सोयीसुविधा तात्काळ खंडीत करणेची कारवाई करणेबाबत कळविले आहे. तसेच पिं. चिं. म. न. पा. हद्दीमधील प्रत्येक गावानुसार संरक्षण विभागाच्या बाधित स. नं. / गट नं. / सि. स. नं. / सेक्टर नं. ची यादी व तेथिल नव्याने निर्माण होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची यादी म. न. पा. च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करणेकामी कळविले आहे. सदरची कारवाई प्रामुख्याने नव्याने निर्माण होत असलेल्या अनाधिकृत उपविभागणी / अनाधिकृत बांधकामाबाबत करावयाची असुन सदरच्या रेड झोन बाधित क्षेत्रामधील पुर्वापारपासुनच्या असणाऱ्या मिळकतींना पुरविल्या जाणाऱ्या सार्वजनिक सोयी-सुविधा निरंतर चालु राहतील.
तरी पिं. चिं. म. न. पा. हद्दीमधील सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण विभागामार्फत जाहीर केलेल्या सुधारित रेडझोन हद्दीमुळे बाधित क्षेत्रावरील नव्याने निर्माण होत असलेल्या अनाधिकृत उपविभागणी / अनधिकृत बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणेपुर्वी शाहनिशा करणेचे आवाहन या जाहीर निवेदनाव्दारे हर्डीकर यांनी केले आहे.