न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड येथे रिक्षा स्टॅंडवर पंचसूत्री कार्यक्रम राबवून रिक्षा स्टँड समाजसेवा केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केल्यामुळे अनेक स्टँडवर नागरिकांना सुलभ सेवा दिली जात आहे, याच धर्तीवर पुणे शहरात देखील रिक्षा स्टँड समाज सेवा केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करू असे, प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न छत्रपती रिक्षा स्टँडच्या उद्घाटन हडपसर रोड येथील मगरपट्टा चौकात नुकतेच बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते
यावेळी हवेली तालुका अध्यक्ष सदाशिव पवार पाटील, पुणे शहर उपाध्यक्ष सागर धर्मे, हडपसर विभाग अध्यक्ष नवनाथ घोडके, स्टँड अध्यक्ष संतोष भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश फडतरे, दत्तात्रय मासाळ, गोविंद नरवटे, सुरेश इंदोरे, गौतम बागलाने, प्रकाश ढवळे, काळू उपाध्ये, विनोद वाघमारे, इस्माईल शेख, गणेश लव्हाळे, रमेश मचाले, किरण आरडे, आप्पा सूर्यवंशी, संदीप थोरात आदी उपस्थित होते.
पुणे शहर हे स्वास्क्रुतीचे माहेरघर आहे. शहरात येणाऱ्या नागरिकांना सुलभ प्रवाशी सेवा दयावी. प्रवाशांची सौजन्याने बोलावे, भाडे नाकारू नये, रिक्षा स्टँडवर पाणपोई वाचनालय, फोनकॉल, रक्तगट आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशाप्रकारे रिक्षा स्टँड हे समाजसेवा केंद्र म्हणून पुढे यावे, असे काम रिक्षाचालकांनी करावे, असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सागर कांबळे, सुनील सेंडकर, श्याम बोंद्रे, लखन पंचमहाल, अमोल शेंडकर, नंदू नवसरे, नागेश जाधव, माऊली पवार, अमर धर्मे, स्वप्नील चव्हाण, अनिल मोरे, परमेश्वर वाघ, गणेश कोळेकर, गुरुस्वामी सुधाकर, सुधाकर नवसारे, सतीश वाघमारे, मोहम्मद शेख, किरण चाबुकस्वार, साहिल मुलाने यांनी परिश्रम घेतले.












