एस. काँग्रेसच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारे व महाराष्ट्रात विकासाचा कलश आणणारे देशाचे माजी उप-पंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची उभारणी सुरू झाली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरून यांनी पिंपरी चिंचवडमध्ये उद्योगनगरी उभारण्यासाठी प्रथम हिंदुस्थान अँटिबायोटिक्सची उभारणी केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली माजी केंद्रीय कृषिमंत्री व माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी संरक्षण क्षेत्रात वैमानिकांसाठी महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला, कृषी उत्पादनाची वाढ करून देशात दुसरी हरीत क्रांती यशस्वी केली. पिंपरी चिंचवड शहरात आशिया खंडातील मोठी एमआयडीसी विकसीत करून, अॅटोमोबाईलची जननी म्हणून शहराची ओळख करून दिली. मोटार-कार उत्पादनास डेट्रोईट ऑफ ईस्टचा दर्जा, क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदावर अध्यक्षपद भुषवून आजी व माजी क्रिकेटपटुंना मानधन, कबड्डी व कुस्तीला आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा, बाणेर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडांगण उभारून आशियायी खेळांचे यशस्वी आयोजन, हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रामुळे पिंपरी चिंचवड शहर जागतिक नकाशावर आले. शेती, सहकार, व्यापार, उद्योग, शिक्षण, दळण-वळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वीज उत्पादन या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी पायाभूत सेवा-सुविधा विकसित केल्या. त्यामुळे महाराष्ट्र रोजगार, शेती, उद्योग, व्यवसायात नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला. परंतु, आज सत्तेवर आलेले युती सरकार शरद पवार यांनी केलेल्या या विकासाला नावे ठेवते. गेल्या पाच वर्षात युती सरकारने यासारखे कोणतेही भरीव विकासकामं पुणे-पिंपरी चिंचवड व राज्यत केलेली नाहीत. पारदर्शक कामांचे गाजर दाखवत पुन्हा एकदा आम्हाला सत्ता द्या म्हणणाऱ्या या युती सरकारला लाज नावाची गोष्ट आहे की नाही. केवळ निर्लज्जापणाने जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची व मागच्या सरकारने केलेल्या विकासकामांना स्वतःचे नाव देत क्रेडीट चोरायचे, यातच हे युती सरकार पटाईत असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट टॅक्स पॅक्टीशनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी केला आहे.
शरद पवारांच्या विचारांवर कार्य करणा-या एस. काँग्रेसच्या जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांसाठी चहा-पान कार्यक्रमाचे रविवार (दि. २२) रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आप्पासाहेब शिंदे बोलत होते. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र स्टेट टॅक्स पॅक्टीशनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष जेष्ठ कार्यकर्ते तात्यासाहेव सपकाळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड अध्यक्ष लालासाहेब शिंदे, तरूण कार्यकर्ते डॉ. काशीनाथ बामणे, मुलचंद भाट, माजी नगरसेवक नंदुशेठ हजारे, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हरी पवार, माजी अध्यक्ष शंकरराव शिर्के, बाबासाहेव साठे, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषराव मोरे, अजित नरसिंग शिंदे, औद्योगिक नागडिया स्वस्त मालामलमासान शिक्षण संस्थेचे एम. डी. जावेकर, सह्याद्री बाजार संस्थापक काकासो. देशमुख, पिंपरी चिंचवड कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष आर. डी. कुटे, पुणे जिल्हा टॅक्स असोसिएशनचे संदीप जाधव तसेच शरद पवार यांच्या विचारावर चालणा-या शहरातील जेष्ठ व युवक एस. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि आयटी क्षेत्रातील काही इंजिनिअर्स उपस्थिती दर्शविली.
पुढे बोलताना आप्पासाहेब म्हणाले की, मागील पाच वर्षात राज्य सर्वच क्षेत्रात पिछाडीवर आले आहे. उद्योग व्यवसायावर आधारीत असणारी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी परराज्यात विस्थापित होत आहे. त्यामुळे येथील रोजगार व उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. पाच वर्षापुर्वी सत्ताबदल झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने उद्योग व्यवसायाला मारक ठरतील, अशी चुकीची ध्येयधोरणे राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरातील हजारो उद्योग परराज्यात स्थलांतरीत झाले. पिंपरी चिंचवडमधील शेकडो लघु उद्योजक देशोधडीला लागले. लाखो कायम व कंत्राटी कर्मचा-यांचा रोजगार संपुष्टात आला. राज्याच्या औद्योगिक गुंतवणुक निर्देशांक तेरापर्यंत खाली आला. महाराष्ट्राला हे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी राज्यात शरद पवार साहेबांचेच नेतृत्व आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात पुन्हा संघटन बांधणी करणे आवश्यक आहे. त्याची सुरूवात पिंपरी चिंचवड शहरातून करावी, या ध्येयाने प्रेरीत होऊन शरद पवारांच्या विचारांवर कार्य करणा-या एस. काँग्रेसच्या जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विस्तारला बळ द्याव.
शरद पवारांच्या कल्याणकारी भूमिकेमुळेच आजवर अनेक पुढारी मंत्री झाले ओबीसी नेते सुधाकरराव नाईक यांना त्यांनी मुख्यमंत्री केले. मंडल आयोग महाराष्ट्रात लागु करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री म्हणून पवारांचे घेतले जाते. ओबीसींना नोकरी त्यामुळे मिळु लागली. खुल्या प्रवर्गातील असणा-या लोकसभेच्या जागी खासदार म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर (वंचीत आघाडीचे अध्यक्ष), रामदास आठवले (आरपीआयचे अध्यक्ष), जोगेंद्र कवाडे यासारख्या मागासवर्गीय नेत्यांना संधी दिली. रमेश शेंटुगे व प्रकाश अण्णा शेंडगे धनगर समाज बंधूंना साहेबांनी आमदार केले. मातंग समाजाचे पा. लक्ष्मण ढोबळे यांना वर्तृत्वातील कौशल्यामुळे २० वर्षे महाराष्ट्रात मंत्रीपदे दिलीत. गवळी समाजाचे सचिन आहेर यांना मंत्री केले. डॉ. जनार्दन वाघमारे (कुलगुरू मराठावाडा विद्यापीठ) यांना लातुरमधून खासदार केले. ओबीसींचे नेते छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री व अनेक मंत्रीपदावर राहिले. धनंजय मुंडे ओबीसींचे फरर्डे वक्तृत्व नेतृत्व बीड जिल्ह्यातून महाराष्ट्राला दिले. प्रफुल्ल पटेल व्यापारी वर्गातील नेता केंद्रात विमान वाहतुक मंत्री केले. चित्रा वाघ सोनार समाजाच्या नेत्या त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष पद दिले, अशा अनेक लोकांना शरद पवारांनी मोठे केले. हे मोठेपण फक्त राज्याचा जाणता राजा पवारांमुळेच त्यामुळे अशा कठीण प्रसंगी आपण सर्वजणांनी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणाने उभे रहावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.















