न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- ताथवडे- डांगे चौकादरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेने उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. या रस्त्यावर वाहतुकीचा सिग्नल पोल आहे. तो कोणत्याही क्षणी पडुन मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत महापालिका आयुक्त यांना शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदन दिले आहे. तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तो पोल बदलण्याचे आपण प्रशासनास आदेश द्यावेत, असे दाखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















