- काँग्रेस शहराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ जून २०२६) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा पदग्रहण सोहळा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे आणि मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिंपरी येथील हॉटेल मध्ये संपन्न झाला.
या पदग्रहण सोहळ्या दरम्यान सुरुवातीला मान्यवर पाहुणे सतेज पाटील येताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, हॉलमध्ये येताच महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अनंतरावजी थोपटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सामर्थ्याचा प्रवास दर्शवणारे युवतींचे नृत्य सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचा ध्वज नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि तो स्वीकारात त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला.
पदग्रहण करताच पक्षातील काँग्रेस पक्षाचा विचार आणि वारसा जपणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
काँग्रेस पक्षाचा पिंपरी चिंचवड शहराचा लोगो, एस आय आर मतदार यादी पुनर्परीक्षण अभियानाच्या माहिती मदत क्रमांकाचे उद्घाटन, पिंपरी चिंचवड काँग्रेस वेबसाईटचे उद्घाटन मा. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यादरम्यान 20 सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब पाटील, सदाशिव तळेकर, वंचितच्या शिल्पा गायकवाड, प्रवीण कांबळे, जावेद इनामदार, महेंद्र सरोदे, अतुल शिंगाडे, मनोज गिल, बाबा बनसोडे, कमलेश जैन, गोरख खळगे यांचा समावेश होता.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या वाकड प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार स्वप्निल बनसोडे यांनी आणि वंचित मधून मोठी मते घेत निगडी मधून निवडणूक लढलेल्या शिल्पा गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.
पदभर स्वीकारल्यानंतर बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या बाजूने नागरिकांचा कौल स्पष्ट जाणवतो आहे या शहराची जडणघडण काँग्रेस कडूनच झाली मात्र 99 नंतर वरिष्ठ नेते शहरात येत नाहीत पवारांशी थेट सामना केला जात नाही, या भावनेने कार्यकर्ते खचत गेले आणि काँग्रेस पक्ष काही प्रमाणात कमकुवत झाला मात्र आता परिस्थिती बदलल्याने येत्या काळात सर्व वंचित उपेक्षित आणि सर्वसाधारण नागरिकांना सर्वांना सोबत घेत सर्वांची काँग्रेस करून दाखवण्याचा मानस आहे, संघटनात्मक काम करत असताना संघटन, प्रशिक्षण, प्रबोधन, आंदोलन आणि परिवर्तन या पंचसूत्री च्या माध्यमातून काम करणार आहे, मनपातील प्रचंड भ्रष्टाचार यावर आंदोलन करत असतानाच मतदार यादी पुनर्परीक्षण अभियानावर अधिक भार देत जून ते ऑक्टोबर मोठे अभियान राबवणार आहे, अल्पसंख्याकांवर होत असलेल्या आक्रमण हाणून पाडण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता मैदानात सज्ज होणार आहे, असे बनसोडे म्हणाले.
आमदार सतेज पाटील म्हणाले,
पूर्वीच्या काळात स्वर्गीय रामकृष्ण मोरे स्वर्गीय अनंतराव थोपटे आणि राज्यातील इतरही नेत्यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत केला मात्र पुढील काळात आघाडीमुळे दुर्दैवाने एकमेकांच्या ठिकाणी लक्ष न देण्याचे ठरले त्यामुळे पक्ष कमी झाला पण जरी अडचण असली तरी रात्र नंतर पुन्हा सूर्य उगवतो त्यानुसार आता तयारी करा दहावीस वर्षांपूर्वीचा काँग्रेस पक्ष पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, परिवर्तन होऊ शकते कारण मतदार तोच निवडणुका मात्र वेगवेगळ्या आहेत. विरोधक विकास डोळ्यापुढे न ठेवता इतर सर्वच मुद्द्यांकडे दिशाभूल करत निवडणूक लढवत आहेत. मात्र काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता हा नागरिकांच्या सोबत अडचणीत उभा आहे हा विश्वास देत पुढे जाणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर हे फ्लोटिंग पोपुलेशन, प्रचंड आर्थिक साम्राज्य, प्रचंड विकास असे शहर बनले आहे आणि या ठिकाणी मनपा सत्तेतील लोक कारभार चुकीचा करत आहेत, राज्यातही हेच लोकसत्तेत असल्याने तिथेही कारभार असाच सुरू आहे राज्यात 9 लाख 32 हजार कोटीचे कर्ज आहे प्रत्येकाच्या डोक्यावर 60 ते 80 हजार रुपये कर्ज वेगवेगळ्या पद्धतीने राज्याने निर्माण केले आहे हे सरकार राज्याचे हित पाहण्यापेक्षा स्वतःचा फायदा पहात काम करत आहे यांचा भावकीचा वाद अजून मिटलेला नाही, लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन आता मात्र 80 लाख नावे कमी करण्यात येत आहेत हे भाजपचे मोठे अपयश आहे 14000 पुरुषांना लाडकी बहीण योजना पडताळणी न करता देत संपूर्ण राज्याची मान खाली घालण्याचे काम या सरकारने केले आहे. 18 ते 30 या वयोगटातील युवक युवतींना संविधानिक मूल्य, महापुरुषांचा खरा इतिहास सांगणे गरजेचे आहे कारण भाजपकडून खोटा इतिहास सांगत मुख्यत्वे युवकांची दिशाभूल केली जात आहे.
संजय आवटे म्हणाले,
आता काँग्रेसने सिव्हिल सोसायटीला सोबत घेत काम करणे महत्त्वाचे आहे, बनसोडे सारख्या युवकाला संधी मिळणे आणि त्यांच्या पदग्रहणाला बंटी पाटील सारख्या नेत्यांनी येणे ही बाब विशेष आहे, येत्या काळात पिंपरी चिंचवड शहर हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए चा भाग मिळवून सुमारे सव्वा कोटी मतदार या ठिकाणी आहेत सर्व जात धर्म पंथाचे लोक या ठिकाणी राहतात म्हणून येत्या काळात तरुण नेतृत्व पुढे येणे गरजेचे नव्या पिढीला नवे राजकारण संविधान मूल्यावर उभा देश हवा आहे त्यांचा देश उद्या कसा असणार आहे मुळा मुठा पावना नद्या कशा असणार आहेत विकासाचे प्रारूप काय असणार आहे पुढच्या पिढीला पाणी मिळणार आहे का या प्रश्नांवर युवकांना अधिक स्वारस्य आहे विकासाचे प्रारूप यावर नवे राजकारण हे करावे लागणार आहे मेट्रो आणि मित्र म्हणजे विकास नव्हे हे या देशाला कळालेले आहे आणि म्हणून सार्वजनिक मानवट्यांवर स्वच्छ पाणी सार्वजनिक रुग्णालयांमध्ये प्रतिष्ठितांचे उपचार श्रीमंतांचे उपचार, सार्वजनिक शाळांमध्ये श्रीमंतांची मुले शिक्षण घेणे यावर सार्वजनिक विकास अवलंबून आहे तो साध्य करणे काळाची गरज आहे.
याप्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील लोकमत पुणे ते संपादक संजय आवटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, हाजी जाकीर शेख, दाहर मुजावर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी महापौर कवीचं भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दही तुले, माजी नगरसेवक अत्तर भाई चौधरी, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. जितेंद्र जैन, प्रा. बी बी शिंदे, गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश खंदारे, स्वप्निल बनसोडे, महादेव वाळुंजकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, वैभव जाधव, छावा संघटनेचे रावसाहेब गंगाधरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी हिराचंद जाधव, महेश नांद्रे, जितेंद्र छाबडा, विजय ओव्हाळ, हरीश डोळस, कुणाल भोसले, बाबा गैसमुद्रे, उमेश बनसोडे, सदाशिव तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.














