न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (शुक्रवारी) अंतिम मुदत होती. या मुदतीत १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी माधार घेण्याची अंतिम मुदत आहे.
यात भाजप – शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, शंकर जगताप- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे प्रशांत कृष्णराव शितोळे, बहुजन समाज पार्टीकडून राजेंद्र माणिक लोंढे, विजय निवृत्ती वाघमारे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश दगडू लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टी एकनाथ नामदेव जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश भाऊराव घोडके, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर ऊर्फ अजित प्रकाश संचेती, जनता पार्टीचे राजकुमार घनश्याम परदेशी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले, राहुल कलाटे, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, सुरज अशोकराव खंडारे, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, राजेंद्र मारुती काटे, जावेद रशिद शेख, कैलास दशरथ परदेशी, रवींद्र विनायक पारधे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. एकूण १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत.















