न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. तब्बल बारा उमेदवार यावेळेस आपले नशीब आजमावणार आहेत. आज निवडणूक अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती.
मुदतीअंती एकूण ६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज माघार घेतले आहेत. यात माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, डॉ. मिलिंदराज भोसले, विष्णू शेळके, महेश तांदळे यांच्या नावांचा समावेश आहे.


















