न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध अंगाने उदयन्मुख युवा नेतृत्व युवराज दाखले हे जनमानसात जबरदस्त उमेदीने कामास लागले आहे. शहरातील अनेक मान्यवर, व्यापारीवर्गाला बरोबर घेऊन, समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं आहे. असं योग्य नेतृत्व विविध माध्यमातून सतत जबाबदारी घेऊन प्रश्न तडीस नेण्यास राज्यभरात ओळखलं जात आहे. विविध पक्षाशी, अनेक नेत्यांशी चांगले संबंध, जनमानसातील चांगली प्रतिमा, असं हे युवा नेतृत्व युवराज दाखले यांच्या रूपाने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना लाभलं आहे. याच जोरावर युवराज दाखले यांना जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव रामचंद्र आल्हाट यांनी पुरस्कृत उमेदवारीचे पत्र देऊन संपूर्ण पक्ष संघटन त्यांच्या बाजूने उभे करण्याची घोषणा केली आहे.
शिवशाही व्यापारी आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात संघटन बांधून व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला असून, अनेक फायदेमंद बाबींवर व्यावसायिक, व्यापारी, समाजातील व विविध प्रकारच्या लोकोपयोगी कामात अग्रेसर असलेली उत्कृष्ट व्यक्ती आमदार म्हणून मतदारांची पहिली पसंती असेल, अशी प्रतिक्रिया पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वत्रच चर्चिले जात आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील अनेक ठिकाणी जोडले गेले असून ते कुशल प्रशासक, संघटक, जनमानसात जबरदस्त प्रतिष्ठा मिळवलेले तरुण तडफदार नेतृत्व पिंपरी विधानसभा मतदारसंघाला मिळत आहे, अशी धारणा समाजातील अनेक नेत्यांची, नागरिकांची, जाणकाराची भावना निर्माण झाली असून युवराज दाखले यांच्या कर्तुत्वात शोधली जात आहे.
सामाजिक कामाचा दांडगा अनुभव असलेलं नेतृत्व दाखले यांच्या योग्य रुपाने मतदारसंघाला मिळत आहे. याचा अभिमान सर्वच स्तरावर पिंपरीकरांना वाटतो आहे. लाभलेले नेतृत्व पिंपरी मतदारसंघातील नागरिक आनंदाने स्वीकार करत आहेत. ही बाब आल्हाददायक ठरली असून सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे. तरुणांना आकर्षित करणारे अनेकांचे मित्र म्हणून परिचित आहेत, असे युवराज दाखले हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे चांगले आमदार निश्चित ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत आहे.















