न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार व मा. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी यांची शिवसेना भवन आकुर्डी येथे बैठक संपन्न झाली. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्क नेते बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अॅड गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, युवासेनेचे समन्वयक जितेंद्र ननावरे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे व शिवसेना पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत शहरप्रमुख योगेश बाबर व शहर संघटिका उर्मिला काळभोर यांनी केले. प्रास्ताविक करताना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले की, नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांच्या प्रचाराची रंगीत तालिम झालेली आहे. त्याचपद्धतीने विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी यादी निहाय यादीचा अभ्यास करून प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाण्याचे आवाहन केले. अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मनोगत व्यक्त करताना मागील पाच वर्षाच्या काळात केलेल्या कामाच्या जोरावर व संपर्कावर आपलाच विजय होणार असल्याचे आत्मविश्वासाने शिवसैनिकांना सांगितले.
पुणे जिल्हा संपर्क नेते बाळा कदम यांनी जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, शहरसंघटिका व त्यांच्या सर्व शिवसैनिकांच्या टीमचे लोकसभेतील नियोजनबद्ध प्रचार कार्याबद्दल अभिनंदन केले. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर या शेजारील मतदार संघात शिवसेनेकडे पिंपरी हा एकमेव मतदार संघ आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी विशेष लक्ष केंद्रित करून काम करण्याचे आवाहन केले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे जिल्हयातुन राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी नियोजनबद्ध दहा दिवसांचा प्रचाराचा कार्यक्रम तयार करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रत्येक गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी उद्यापासून यादीवर काम करून घरोघरी प्रचार पत्रके, अहवाल, स्लीपा पोहचविण्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. पुढील दहा दिवस अहोरात्र शिवसैनिकांनी परिश्रम घ्यावे. मी देखील जास्तीत जास्त वेळ प्रचारासाठी देणार असल्याचे सांगितले. पिंपरी – चिंचवड – भोसरी व मावळ विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या सर्व उमेदवाराना विक्रमी मतदानाने विजयी करण्याचे आवाहन केले.















