- तिन्ही मतदारसंघातील घेणार आढावा; सचिन चिखले यांची माहिती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व अंगिकृत संघटना यांच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज शुक्रवारी (दि. ११) रोजी पिंपरीतील मोरवाडी येथे सायंकाळी ६.०० वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस मनसे नेते बाबु वागस्कर, पिंपरी चिंचवड प्रभारी गणेश अप्पा सातपुते, रणजित शिरोळे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शहरातील सर्व विंगचे पदाधिकारी, मनसैनीक बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील आढावा घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार पुढील ध्येयधोरणे आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.















