न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- रहदारीच्या चौकातील होर्डिंगला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १०) रोजी सकाळी सातच्या सुमारास कोकणे चौक, रहाटणी येथे घडला. नितीन उद्धव मंडलिक (वय २७, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. मागील दहा वर्षांपासून तो रहाटणी येथे राहत होता. एक वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. मात्र, त्याची पत्नी मूळ गावी राहत होती. नितीन उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवित होता. बुधवारी रात्री त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.