न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३७ वा वर्धापन दिनानिमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर यांनी देखील कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, सह शहर अभियंता मकरंद निकम, वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, श्रीकांत सवणे, उपअभियंता माधव सोनावणे, महानगरपालिका कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्लॅस्टीक मुक्तीसाठी उपस्थितांना शपथ दिली. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याची शपथ देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वांना दिली आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.
क्रिडा विभागातर्फे संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये माधव सोनावणे यांना पहिला, सुरेश साळुंखे यांना दूसरा तर तिसरा क्रमांक प्रशांत जोशी यांना मिळाला तर महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत मनाली राणे यांना पहिला, उज्वला गोडसे यांना दूसरा तर तिसरा क्रमांक सुप्रिया सुरगुडे यांना मिळाला. वैद्यकीय विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये ४५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच नेत्रदान स्विकृती फॉर्म देखील स्वीकारण्यात येत होते. त्यात १४ कर्मचाऱ्यांनी नेत्रदान करण्याकरीता फॉर्म जमा केले. अशा रितीने मनपा वर्धापन दिन संपन्न झाला.















