न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री. सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती sveep कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत.
सन २०१९ चे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान टक्केवारी वाढविणेसाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदार जागृती करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी तसेच १००% मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचाच भाग म्हणुन (दि. १०) रोजी एक्साईड बॅटरी लि. चिंचवड या कंपनीमध्ये दुपारी ३.०० वाजता कंपनीतील दोन्ही पाळीतील ५०० कर्मचारी व अधिकारी यांना मतदान करणेसाठी व इतरांचा मतदानामध्ये सहभाग वाढविणेसाठी स्वीप कक्ष प्रमुख श्री. मुकेश कोळप यांचे व्याख्यान झाले. तसेच मतदान जागृतीकरणे करीता आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली.
यावेळी एक्साईड बॅटरी लि. चे प्लांट हेड श्री. के अनिरुद्धा, श्री. डीसील्वा, श्री.प्रफुल जोशी सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. निवडणुक विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री. सुनिल वाघमारे, sveep कक्षप्रमुख श्री. मुकेश कोळप यांनी मार्गदर्शन केले, श्री तानाजी सावंत, श्री सुशांत जोशी, श्री. विलास केंजळे, श्री. सुधीर दारोकार यांनी संयोजन केले.















