न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री.सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती sveep कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत. सन २०१९ चे विधानसभा निवडणुक मतदान टक्केवारी वाढविणेसाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी तसेच १००% मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत.
स्वामी विवेकानंद प्राथ. विद्यामंदीर, काळभोरनगर शाळेतील विद्यार्थ्यांची दि. 10/10/2019 रोजी दुपारी 5.00 वाजता रॅली काढुन मतदार जनजागृती करीता घोषणा देण्यात आली. काळभोरनगर चौकात मतदान जागृतीबाबत व्याख्यान झाले व नागरीकांना मतदान जागृतीकरणे करीता आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली.
यावेळी स्वामी विवेकानंद प्राथ. विद्यामंदीर, शाळेचे मुख्याध्यापक सौ. पाटील अलका, उप शिक्षक श्रीम. राउत अर्चना, श्रीम. इंदुलकर सुजाता, श्रीम.
नेवरे पुष्पा, श्री. देशमुख मंगेश इतर सर्व कर्मचारी, शिक्षक व १२५ विद्यार्थी उपस्थित होते. निवडणुक विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री.सुनिल
वाघमारे, sveep कक्षप्रमुख श्री मुकेश कोळप यांनी मार्गदर्शन केले, श्री तानाजी सावंत, श्री सुशांत जोशी, श्री. विलास केंजळे, श्री.सुधीर दारोकार यांनी संयोजन केले.















