न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- येत्या विधानसभा निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करणारी शपथ आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिली. जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे, व २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या वर्धापनदिनामित्त त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नोडल ऑफीसर तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, नगरसचिव उल्हास जगताप, उपअभियंता माधव सोनावणे, महानगरपालिका कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.















