न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड व भोसरी विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या पुरस्कुत उमेदवारांनी स्वत: जाहीर करावे की, निवडणूकीनंतर ते कायम महाआघाडीबरोबरच राहतील आणि युतीला आतून, बाहेरुनही किंवा कसलाही पाठींबा देणार नाही, असे जाहिर करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. महाआघाडीचा धर्म पाळत कॉंग्रेस पिंपरी विधानसभेत अण्णा बनसोडे यांना पाठिंबा देत आहे, असेही सचिन साठे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक प्राधिकरण आकुर्डी येथे शुक्रवारी (११ ऑक्टोबर) आयोजित करण्यात आली होती. यावेळी पिंपरी विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, प्रदेश काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा शामला सोनवणे, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या बिंदू तिवारी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रसेच्या उपाध्यक्षा निगार बारस्कर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, असंघटीत कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महिला अध्यक्षा शितल कोतवाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, युवा नेते ॲड. क्षितीज गायकवाड, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसिम इनामदार, माजी अध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, सतीश भोसले, ज्येष्ठ नेते हरीदास नायर, मेहताब इनामदार, एन्.ए.बारस्कर, व्ही.जे.खंडाळे, अनिरुध्द कांबळे, तानाजी काटे, मुन्सफ खान, सुनिल राऊत, हिरामण खवळे, भास्कर नारखेडे, संगीता कळसकर, हुरबानो शेख, मीना गायकवाड, दिपक जाधव, तुषार पाटील, जीफीन जॉन्सन, चंद्रशेखर यादव, वासिम शेख, अक्षय शहरकर, नितीन पटेकर, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, माधव पुरी, कुंदन कसबे, तुषार पाटील, अनिकेत आरकडे आदी उपस्थित होते.
सचिन साठे यावेळी म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे शहरातील तीनही जागा गमवाव्या लागल्या. पिंपरीत त्यावेळी काँग्रेसला पडलेली मते ही काँग्रेसच्या उमेदवाराची नसून काँग्रेसची विचारधारा मानणा-या मतदारांची होती आणि त्या निवडणूकीत अण्णा बनसोडे अवघ्या अडीच हजार मतांनी पराभूत झाले होते. आता काँग्रेसची हक्काची मते अण्णा बनसोडे यांना मिळतील आणि २४ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर त्यांचा विजयानंतर पहिला सत्कार काँग्रेसच करेल. शहर काँग्रेसची भूमिका आम्ही प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोनवर सांगितली आहे. या विधानसभा निवडणूकीत चिंचवड, पिंपरी किंवा भोसरीतील कोणतीही एक जागा कॉग्रेसला द्या अशी शहर कॉंग्रेसची मागणी होती. परंतू ती मिळाली नाही. तरी देखील काँग्रेस आघाडीचा धर्म पाळत आहे, असे सचिन साठे म्हणाले.
माजी आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न बाळगता पिंपरी विधानसभेत काम करीत आहेत, पक्षाचे आदेश पाळत आहेत ही जमेची बाजू आहे. मी उमेदवार या नात्याने सर्व कॉंग्रेसच्या व महाआघाडीतील कार्यकर्त्यांचा सन्मान राखेल. माझ्याकडून कोणताही दुजाभाव होणार नाही, अशी ग्वाही देतो.
स्वागत सचिन साठे, सुत्रसंचालन मयूर जयस्वाल आणि आभार वसिम इनामदार यांनी मानले.















