न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता भंगबाबत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २१ मतदारसंघातून निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल अॅपवर १४२ तक्रारी आल्या आहेत.
त्यापैकी १२५ तक्रारी दखलपात्र असून, त्यांचे निराकरण करण्यात आले आहे, तर सोळा तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सी-व्हिजिल अॅपवर येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघातील भोसरी मतदारसंघातून १२, पिंपरीमधून १३ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.















