न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा निवडणुक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आमदार लक्ष्मण जगताप यांनी रहाटणी – काळेवाडी – तापकीर नगर परिसरात आघाडी घेतली असून, ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटींचा धडाका लावला आहे.
संपूर्ण चिंचवड मतदारसंघात सध्या भाजपला अनुकूल वातावरण असून रहाटणी काळेवाडीतही कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. तापकीरनगर येथील ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक असून ते देखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रचारात उतरले आहेत.
तापकीर यांनी तापकीर नगर, ज्योतिबानगर, तापकीर मळा चौक या परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटींवर जोर दिला. यावेळी जाहीरनामा पत्रकाचे वाटप करून राज्य सरकार तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना देत राज्याच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनाच आपले बहुमूल्य मत देण्याचे आवाहन तापकीर यांनी यावेळी नागरिकांना केले.















