- त्या शाळेवरून राहुल कलाटे यांनी केले आमदारांना लक्ष
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०१९) :- ज्यांना अनधिकृतपणे उभारलेली स्वतःची शाळा वाचविता आली नाही ते सर्वसामान्यांचे बांधकाम काय वाचविणार, असा घाणाघात चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला.
रविवार सुटीच्या दिवसाचे औचित्य साधत कलाटे यांनी आज मतदारसंघाच्या विविध भागात दुचाकी रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. रॅलीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी करत राहूल कलाटे यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. रॅली दरम्यान त्यांनी विरोधी उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यावर अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून निशाणा साधला.
उपस्थितांसमोर चिंचवड विधानसभा मतदार संघातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर राहुल कलाटे म्हणाले की, सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या मारणार्यांनी अनधिकृत बांधकाम प्रश्नाचा कांगावा केला. परंतु, भाजपची एकहाती सत्ता असूनही हा प्रश्न सोडविता आलेला नाही. एकही बांधकाम काय बांधकामाची साधी वीटही अधिकृत झाली नाही. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी शास्तीकर माफीसाठी कर संकलन कार्यालयांवर मोर्चे काढत नौटंकी केली होती. सरसकट शास्ती कर माफी झाली नसताना विद्यमान आमदार मूग गिळून आहेत. खरंच यांना अनधिकृत बांधकाम प्रश्नाचा आणि शास्ती कराचा कळवळा असता तर त्यांनी सत्तेत राहून भाजपविरोधात आंदोलनाची धमक दाखविली असती. परंतु, यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. ज्यांना स्वतःची शाळा वाचविता आली नाही ते सर्वसामान्यांची बांधकामे काय वाचविणार, असा सवाल कलाटे यांनी केला.
पिंपळे गुरवचा सात बारा आपल्या नावावर असल्याचे सांगत सर्वसामान्यांना दरडावणार्यांना नदीपात्रातील जागा पुरेनाशी झाली आहे. पिंपळे गुरव परिसरातील अख्खे नदीपात्र आमदारांच्या बगलबच्च्यांनी गिळंकृत केले आहे. पूररेषेत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. पत्र्याच्या शेड ठोकून अतिक्रमणे केली आहेत. गॅरेज व्यावसायिकांकडून थेट नदीपात्रात वाहनांच्या वॉशिंगचे पाणी सोडले जात आहे. पवनामाईचे पावित्र्य धोक्यात आणले असताना नदी सुधारच्या नावाखाली नदी संवर्धनाचा दिखावा केला जात आहे. ऑगस्ट महिन्यात दोन दिवस थैमान घातलेल्या पुराने आमदारांचा नदी सुधारच्या देखाव्याचा पर्दाफाश केला आहे. नदी बचाव, जगताप हटावफ, असे साकडे पिंपळे गुरवच्या रहिवाशांनी आपल्याला घातले आहे. पिंपळे गुरवकरांची ही इच्छा आपण नक्कीच पुर्ण करु, असा दावा कलाटे यांनी केला.
सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी या भागातील बांधकाम व्यावसायिकांना सत्तेचा माज दाखवत विद्यमान आमदारांकडून दमदाटी केली जात आहे. पाणी टंचाईच्या नावाखाली बांधकामे परवाना बंदीच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरले होते. जिथे बांधकाम व्यावसायिकांची ही अवस्था असेल तेथे सर्वसामान्यांचे काय, असा सवाल राहुल कलाटे यांनी केला. आमदारांच्या बालेकिल्ल्यातील विक्रेते, व्यावसायिक दहशतीखाली आहेत. त्यांना आपल्याकडून अपेक्षा असल्याचे कलाटे यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकांना दमदाटी, अरेरावी
सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी या भागातील बांधकाम व्यावसायिकांना सत्तेचा माज दाखवत विद्यमान आमदारांकडून दमदाटी केली जात आहे. पाणी टंचाईच्या नावाखाली बांधकामे परवाना बंदीच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरले होते. जिथे बांधकाम व्यावसायिकांची ही अवस्था असेल तेथे सर्वसामान्यांचे काय, असा सवाल राहुल कलाटे यांनी केला. आमदारांच्या बालेकिल्ल्यातील विक्रेते, व्यावसायिक दहशतीखाली आहेत. त्यांना आपल्याकडून अपेक्षा असल्याचे कलाटे यांनी सांगितले.











