न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०१९) :- उन्नती सोशल फौंडेशन आयोजित नवरात्री महोत्सवाचा समारोप कोजागिरी पौर्णिमा साजरी करून झाला. त्या निमित्ताने विविध सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील सर्व थरातील आबालवृद्ध महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पौर्णिमेच्या शीतल चंद्र प्रकाशात सर्वानी केशर शर्करायुक्त सुमधुर दुधासोबत अल्पोपहारचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी उन्नती सोशल फौंडेशन च्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, उद्योजक शंकर जगताप, हभप जगन्नाथ काटे, गिरीश जाचक, राजू शेलार, उमेश शेलार, उद्योजक राजू भिसे, अतुल पाटील, अजिंक्य भिसे, शंकर चोंधे, भरत भिसे, प्रज्वल धनवटे, साहिल कापसे आदी उपस्थित होते.
हा कोजागिरी पौर्णिमा सोहळा उन्नती सोशल फौंडेशन, आनंद हास्य योगा क्लब, विठाई मोफत वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लब पिंपळे सौदागर सर्व सभासद बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.











