न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०१९) :- फिर्यादी देवासी हे २८ सप्टेंबर रोजी सांगवी फाटा येथून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या पाच आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील अठरा लाख रुपयांची रोकड व दुचाकीची चावी जबरदस्ती हिसकावून नेली.
या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हेशाखा युनिट चार करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी पथकातील उपनिरीक्षक हर्षल कदम यांना बातमी मिळाली की, फुटेजमध्ये दिसणारे आरोपी आकाश कदम व कल्लू वाघमारे कसबा पेठ येथील असून ते नवी सांगवी परिसरात आले आहेत.
त्यानुसार त्यांनी नवी सांगवी परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपयांची रोकड दोन दुचाकी आणि एक सोन्याची चेन असा नऊ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.