न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०१९) :- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ७ ऑक्टोबरपासून मावळात त्यांचा झंझावाती दौरा सुरु आहे. प्रचाराच्या आठव्या दिवशीही रांगोळीच्या सजावटीतून, औक्षणांतून, मिरवणुकांमधून, पदयात्रा, कोपरा सभांमधून मतदारांचा एकच कौल दिसतो, तो म्हणजे मावळात यंदा ‘वन अँड ओन्ली सुनिल अण्णा !’
सोमवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रात सुनिल शेळकेंचा ताफा गवळीवाडा, इंदिरानगर, तुंगार्ली, पांगळोली, वलवण, नांगरवाल, आगवाली चाळ या भागात होता. यावेळी सुनिल अण्णांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनीही अण्णांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले. गावागावात ‘ वन अँड ओन्ली सुनिलअण्णा’, ‘ओन्ली अण्णा’, ‘आमचं ठरलंय, आमदार तर होणारच’ अशा आशयाच्या सुरेख रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या.
यावेळी सुनिल शेळके, बबनराव भेगडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











