- आमदार लांडगे यांच्या व्हिजन २०-२० ची अदभूत निर्मिती – युवानेते पांडाभाऊ साने
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळेच भोसरी विधानसभा मतदासंघात संतपीठाची निर्मिती होत आहे. टाळगाव चिखली येथे होत असलेल्या या संतपीठामुळे महाराष्ट्रभरातून येणाऱ्या साधकांना अध्यात्मिक ज्ञान मिळविण्यासाठी संतपीठ मोलाचे व्यासपीठ ठरणार असल्याचे युवानेते पांडाभाऊ साने यांनी सांगितले.
न्यूज पीसीएमसी शी बोलतान साने म्हणाले की, चिखली गावाला संप्रदायाचा वसा आणि वारसा आहे. भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा, वारकरी सांप्रदायाचे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, याकरीता जागतिक दर्जाचे संतपीठ टाळगाव चिखलीत उभारण्यास आमदार महेश लांडगे यांनी व्हिजन २०-२० अंतर्गत संतपीठाची संकल्पना हाती घेतली. त्यातून टाळगाव चिखली येथे महाराष्ट्रातील पहिले संतपीठ उभारले जात आहे.
श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केले. त्यावेळेस त्यांच्या हातातील टाळानी चिखली गावात प्रस्थान केले. म्हणून या गावाला टाळगाव चिखली, असे म्हणतात. चिखली गावाची टाळगाव चिखली या नावाने प्रसिध्दी, गावाची दिंडी महाराजांच्या सोहळयाबरोबर रथाच्या मागे क्रमांक. ३८. वर चालते. देहुपासुन-पंढरपूरपर्यंत ३०० भावीक पायी चालतात. त्याची सर्व व्यवस्था दिंडीच्या वतीने केली जाते. चिखली गावामध्ये टाळसाठी भव्य मोठे मंदिर आहे. तेथे प्रत्येक एकादशीला किर्तनाचा कार्यक्रम होतो व देहुच्या एकादशी आळंदीहुन दिंडया देहुला टाळाचे दर्शन घेवुन जातात व आळंदीच्या एकादशीला देहूहुन टाळमंदिरात विश्रांती घेवुन दिंडया पुढे मार्गस्थ होतात. अशा अनेक दिंडया व वारकारी टाळमंदिरात ये जा करीत असतात. अशा संप्रादायाचा वसा व वारसा असलेल्या टाळगाव चिखलीमध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून संतपिठ होत आहे.















