न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर प्रतिनिधी :- भारताचे मा. राष्ट्रपती व मिसाईल गुरु डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी सर्व प्रथम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर व शाळेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे विद्यार्थ्यांना कलाम यांच्या कार्याबद्दल माहिती सांगताना म्हणाले कि, कलाम हे एक आगळ-वेगळ रसायन होते, ज्याने आण्विक बाबतीत भारताला कशा प्रकारे स्वयंपूर्ण केले, तसेच त्यांची विद्वत्ता, अभ्यासपूर्ण नियोजन, सकारात्मक वृत्ती, त्याग या आदी बाबींमुळे डॉ. कलाम यांनी स्वतःला एका उंचीवर कसे नेऊन ठेवले? याबाबत मार्गदशन केले. आज भारत देशाला कलाम यांच्या सारख्या महापुरुषांची कशी आवश्यकता आहे याचे महत्वही काटे यांनी यावेळी विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील व सुप्रिया कोमपेल्ली यांनी केले तर आभार रूपा तारे यांनी मानले.