न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर प्रतिनिधी :- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाबिश, आनंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, सुमित आखाडे, राजकुमार खोत आदी उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळेच्या दर्शनी भागात वाचन प्रेरणा दिनाचे भित्तीपत्रक लावण्यात आले होते. यात वाचन कट्टा, पुस्तकपेढी, पुस्तकवाचन संकल्प, पुस्तकाचे प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य स्वच्छतेबाबत कसे जागरूक रहावे याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा शेलार यांनी तर आभार प्रियांका लाडे यांनी मानले.