- आ. महेश लांडगे यांनी ७७३७९ मताधिक्क्याने केला विलास लांडे यांचा दणदणीत पराभव
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांनी माजी आमदार विलास लांडे यांचा तब्बल ७७३७९ या मताधिक्क्याने दणदणीत पराभव केला आहे.
विलास लांडे हे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. या पराभवामुळे विलास लांडे यांचा राजकीय प्रवास संपल्यात जमा झाल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.















