न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राहुल कलाटे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष्मण जगताप यांना टफ फाईट दिली. त्यामुळे अटी-तटीच्या लढतीत मात्र, जगताप यांचा विजय झाला.
याबाबत जनतेशी संवाद साधताना पराभूत उमेदवार राहुल कलाटे म्हणाले की, चिंचवडमधील सर्वांच्या आशीर्वादाने मला १ लाख १२ हजार २२५ इतक्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली. माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला. प्रत्येक मत माझ्यासाठी प्रेरणादायी असून, त्यासाठी मी चिंचवड मतदारसंघात सदैव कार्यरत राहील.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे, पाठिंबा दिलेल्या संघटना व इतर सर्व पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व हजारो मित्र, कार्यकर्ते यांनी केलेल्या मोलाचे सहकार्य मी विसरू शकत नाही. पाठिंबा दिलेल्या संघटना तसेच सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली.















