न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०१९) :- बनारसी हे मूळचे हरियाणा येथील रहिवासी आहेत. कामाच्या शोधात ते मागील काही दिवसांपूर्वी कुटुंबासह पुण्यात आले आहेत. मोशी परिसरात रस्त्याच्या बाजूला ते हेल्मेट विकण्याचे काम करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालतो.
एक ट्रक शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी येथील जुना जकात नाका येथून पुण्याकडे जात होता. जकात नाक्यापासून पुण्याकडे काही अंतर आल्यानंतर ट्रकने अचानक रस्त्याच्या मधला दुभाजक ओलांडून ट्रक विरुद्ध लेनवर आला. ट्रकने विरुद्ध लेन ओलांडली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोळंकी यांच्या झोपडीत ट्रक शिरला. झोपडीमध्ये गाढ झोपेत असलेला अकरा वर्षाच्या गोपी यामध्ये गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच गोपीची आई बेबी यांच्या देखील पायाला गंभीर दुखापत झाली.
ही घटना आज (शुक्रवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी जुन्या जकात नाक्याजवळ घडली. गोपी बनारसी सोळंकी (वय ११, मूळ रा. हरियाणा) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर बेबी बनारसी सोळंकी (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बनारसी सोळंकी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.