न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०१९) :- एका अल्पवयीन मुलीला ३० वर्षीय युवकाने लग्नाची फूस लावून वारंवार अत्याचार केले. अनिकेत भगवान काळभोर (वय ३०, रा. काळभोरनगर आकुर्डी) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक व ती तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी काळभोर याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तरुणी अल्पवयीन असतानाही तिच्यावर अत्याचार केला.
शेवटी युवकाने नकार देताच १७ वर्षीय मुलीने वाकड पोलीस ठाण्यात युवकाच्या विरोधात फिर्याद दाखल केली. वाकड पोलिसांनी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.