न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पुणे महामेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवारी) ‘दिशा’ समितीच्या बैठकीत केली.
यावेळी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी तर पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी बैठकीत पुणे महामेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करावा. शहराची स्वतंत्र ओळख आहे, ती पुसली जाऊ नये. त्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. त्यावर जावडेकर म्हणाले, ‘पुणे महामेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवडचा उल्लेख करण्याबाबत विचार केला जाईल, सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हणाले.