न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर आज (बुधवार) सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. मात्र, कुठल्या कारणासाठी ही कारवाई करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अचानक धाड टाकली. त्याचबरोबर कंपनीच्या दिल्ली, मुंबई, पुणे येथील कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. देशासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कंत्राटही याच कंपनीकडे आहे.














