न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- केरळ येथील शबरीमळा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा कोर्टाने जो निर्णय दिला. तो निर्णय कोर्टाने मागे घावे या मागणीसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील मल्याळी बांधवानी आज शांती यात्रा काढून विरोध दर्शविला.
यावेळी नगरसेवक बाबू नायर, हरिदास नायर, के हरि नारायणन, राजन नायर, शबरीमळा आयप्पा सेवा संघमचे सहसचिव वर संयोजक नंदकुमार नायर आदी उवस्थित होते.
पिंपरी येथील एच ए मैदान ते डॉ. आंबेडकर चौक या दरम्यान ही यात्रा काढली होती. भगवान आय्यप्पा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सुरुवात झाली. यावेळी पुणे, लोणावळा, हडपसर, पिंपरी चिंचवड या परिसरातील सुमारे ५ हजार नागरिक सहभागी झाले होते. शबरीमळा वाचवा, संस्कृती संवर्धन करा, असे फलक हाती घेऊन भाविक ‘स्वामी शरणम, अय्यपा शरणम’ असा नामजप करीत होते.