न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- नवकार महामंत्र हा विश्वकल्याणाचा मंत्र आहे. हा महामंत्र कोणत्याही एका धर्माचा वा समाजाचा महामंत्र नाही. यामध्ये कोणत्याही विशिष्ट देवतेची, व्यक्तिची स्तुती नसून सर्व जिनेंद्रियांना, सिध्दभक्तांना व आचार्यांना नमण करण्याचा हा मंत्र आहे.
कासारवाडी येथील जैन स्थानकातील आनंद दरबारामध्ये चातुर्मासानिमित्त नवकार महामंत्र व सिध्दच ” अनुष्ठान नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमात पुज्य विरती साधना, डॉ. अनुपमा, पुज्य जिनेश्वराजी उपस्थित होते. यावेळी जिनेश्वरजी प्रवचन देत होत्या.
यानंतर अनुपमा यांनी मंगलपठनाच्या माध्यमातन सर्वांना संदेश दिला. बावीस दाम्पत्य अनुष्ठानच्या धार्मिक पध्दतीमध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे संयोजन संदीप फुलपगार, सुशील बहु व प्रा. अशोक पगारिया यांनी केले.















