न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- महापौर पदासाठी येत्या सोमवारी (दि. ११) पर्यंत आरक्षणाची सोडत काढून तसा आदेश काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौराची निवड २१ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या राज्य सरकार स्थापनेवरून घोडे अडले आहेत. त्यामुळे महापौर पदाच्या आरक्षणाची निवड काढण्याची प्रक्रिया रखडली आहे. ही प्रक्रिया प्रशासकीय आहे. त्यामुळे ड्रॉ काढण्याची प्रक्रिया सोमवार (दि. ११) पर्यंत पूर्ण होऊन तसे पत्र पालिकेस मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यास आणखी २ ते ३ दिवसांचा विलंब झाला तरी, ही निवड मुदतीमध्ये घेणे शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.















