न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- निगडी प्राधिकरण मधील सेक्टर क्रमांक २५ मध्ये कोटक महिंद्रा बँक आहे. या बँकेत फिर्यादी टिळेकर यांचे खाते आहे. त्यांनी बँकेची लॉकर सेवा घेतली आहे. त्यामध्ये जून २०१७ दरम्यान त्यांनी एक लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवले.
दरम्यानच्या काळात बँकेतील कर्मचा-यांनी टिळेकर यांच्या परस्पर त्यांच्या लॉकरमधून दागिने काढून त्याचा अपहार केला. ले. कर्नल सचिन रघुनाथ टिळेकर (निवृत्त) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बँकेच्या कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















