न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०१९) :- विश्व सिंधी सेवा संगम ट्रस्ट व गुरुद्वारामधील विश्वस्त मंडळ आणि सिंधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनानक जयंतीनिमित्त रविवार (दि. १०) रोजी पहाटे ५ वा. पिंपरी येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरीतील सुखसागर गुरूद्वारामधून प्रभात फेरीला सुरवात होणार असून संपूर्ण पिंपरी परिसरातून ही फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सांगतादेखील सुखसागर गुरुद्वारामध्ये होणार आहे. या प्रभातफेरीमध्ये शहरातील सर्व शिख व सिंधी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












