न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०१९) :- मोरवाडी न्यायालयास जाग अपुरी पडत असल्याने नेहरूनगर येथील इमारतीमध्ये न्यायालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात येणार आहे. दिवाणी व फौजदारी न्यायालय नेहरूनगर येथील महापालिकेच्या इमारतीत स्थलांतर करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. या इमारतीत फर्निचर, विद्युतकामे पूर्ण करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना सुचवले आहे.
शुक्रवारी (दि. ८) रोजी इमारतीची पाहणी व आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हा न्यायाधीश सत्यनारायण नावंदर शहरात आले होते. त्यानुसार इमारतीतील कामाबाबातचा आराखडा न्यायालयाच्या वतीने महापालिकेस देण्यात येणार आहे.
या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष दिनकर बारणे, अतिष लांडगे, उपाध्यक्ष अतुल अडसरे, पिंपरी न्यायालयाचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नावंदर उपस्थित होते.















