न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर महापौर व उपमहापौर निवडीचा विषय नाही. यामुळे या दोन्ही पदासाठी त्या सभेत निवड होण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी, त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
महापौर व उपमहापौर यांची मुदत २१ नोव्हेंबरला संपत आहे. त्या दोन्ही पदांच्या निवडीसाठी २० किंवा २१ तारखेला विशेष सभा आयोजित करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेच्या विषयपत्रिकेवर निवडीचा विषय आणणे आवश्यक होते. मात्र, विषयपत्रिकेवर हा विषय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवड लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.















