न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, चिखली या गावातील सर्व नागरिक व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन प्रस्तावित नगररचना योजनेस तीव्र विरोध दर्शविला आहे.
सदर भाग हा टीपी स्किममधून वगळण्यात यावा. अशी मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर जाधव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच नगररचना योजना राबविण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनास केल्या आहेत.















