न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- काँग्रेस नेत्यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आयोजित केलेली बैठत रद्द करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.
शरद पवार यांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. आज काँग्रेस नेते चर्चेसाठी मुंबईत येणार नाहीत. २ दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
“आज राज्यपातळीवरील नेते राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करतील. राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या मुदतीपूर्वी कोणताही निर्णय न झाल्यास राज्यपाल काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावतील. आम्हाला आणखी एक-दोन दिवस चर्चा करायची आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी त्यानंतरही आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो,” असंही ते म्हणाले.















