न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०१९) :- मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (पिंपरी – चिंचवड शाखा) वतीने ज्येष्ठ रंगकमींचा नुकताच सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम परिषदेच्या चिचवड येथील पंडित पद्माकर कुलकर्णी कलामंदिरात झाला. ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मीचा सत्कार करण्यात आला. नाट्य अभिनेते आणि संगीतकार मघु जोशी, नाट्यलेखक – दिग्दर्शक माधव पाटील, नाट्य अभिनेते – दिग्दर्शक माधव जोगळेकर, नाट्य – अभिनेते डॉ. जयंत महाजन, तसेच लोकप्रबोधनाच्या काम करणाऱ्या लोककलाकार शारदा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
परिषदेच्या रंगकमींनी ‘ पांडवप्रताप ‘ या विनोदी एकांकिकेचे अभिवाचन केले. सत्कारार्थी शारदा मंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरील एकपात्रीचे सादरीकरण केले. डॉ. महाजन, जोशी, पाटील यांनी पूर्वीपासून आजपर्यंतच्या रंगभूमीच्या वाटचालीचा आढावा व स्वानुभव कथन केले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र आमले यांचाही सत्कार केला.
परिषदेचे शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले. गौरी लढि यांनी सूत्रसंचालन केले. सुहास जोशी यांनी आभार मानले. किरण येवलेकर, राजेंद्र बंग, संतोष शिंदे, महेश लाकाळ, रघु ढेमरे यांनी संयोजन केले.















