- तर, पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधरण गटासाठी राखीव
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) पुढील अडीच वर्षासाठी आरक्षण राखीव झाले आहे. राज्यातील २७ महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आज बुधवारी (दि. १३) रोजी आरक्षण सोडत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहावा मजला मंत्रालय मुंबई येथे दुपारी तीन वाजता आयेाजित केली होती.
यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी (खुला) सर्वसाधारण महिलेस आरक्षण सोडतीद्वारे निश्चित झाले आहे. या सोडतीच्या वेळी महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आदी उपस्थित होते. त्यामुळे येत्या २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वसाधरण खुल्या गटातील महिलेची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी निवड होणार आहे.
इतर महापालिका महापौर सोडत :-
• मुंबई- ओपन
• पुणे – ओपन
• नागपूर – ओपन
• ठाणे- ओपन
• नाशिक – ओपन
• नवी मुंबई – ओपन महिला
• पिंपरी चिंचवड – ओपन महिला
• औरंगाबाद- ओपन महिला
• कल्याण डोंबिवली – ओपन
• वसई विरार- अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
• चंद्रपूर – ओपन महिला
• अमरावती- बीसीसी
• पनवेल- ओपन महिला
• नांदेड-बीसीसी महिला
• अकोला – ओपन महिला
• भिवंडी- खुला महिला
• उल्हासनगर- ओपन
• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
• परभणी- अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली- ओपन
• सोलापूर-बीसीसी महिला
• कोल्हापूर-बीसीसी महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• जळगाव खुला महिला















