न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०१९) :- आरोपींनी संगणमत करून फिर्यादी प्रीतम यांच्या जागेतील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेकायदेशीररित्या घरात घुसून जागेचा ताबा घेतला. तसेच प्रितम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना रविवारी (दि. १०) रोजी पिंपळे गुरव येथे घडली. लक्ष्मण शिवाजी चव्हाण (रा. पिंपळे गुरव), मंगेश लांडे (रा. कासारवाडी), रोहन भागवत (रा. पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रीतम प्रमोद जवाजीवार (वय ४२, रा. खडकी, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.















