न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास व मनपा भवनातील प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्याच प्रमाणे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याही पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
चिंचवड स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, अनिल सौंदाडे, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष सतिश भवाळ, आसाराम कसबे, दिपक कसबे, संजय ससाने आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


















