न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- जनसेवा सहकारी बॅंक लि. पुणे शाखा एमआयडीसी भोसरी शाखेचा १८ वा वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नव-निर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अडव्होकेट बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे पाटील यांचा सत्कार बॅंकेचे माजी अध्यक्ष व संचालक अॅड. सतीश गोरडे, राष्ट्रीय स्वयंसेवक महाराष्ट्र प्रांत धर्मजनक प्रमुख हेमंत हरहरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार कऱण्यात आला. अॅड.अतुल अडसरे, उपाध्यक्ष अॅड.हर्षल नढे, सचिव अॅड. सुजाता बिडकर, (ऑडिटर) अॅड. सुजाता कुलकर्णी, सहसचिव पूनम राऊत, खजिनदार अॅड. सागर अडागळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उदयोजिका सुनिता पाटसकर, अॅड.रुपाली वाघेरे, अॅड.रोहिणी जगताप, अॅड.सुनिल कडुसकर आदी उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापक विलास लांडगे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अॅड. सतीश गोरडे यांनी केले. आभार विनायक जोशी यांनी मानले.












