न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- चिंचवड आणि पिंपरी परिसरात लोखंडी रॉड, कोयता यांसारखी हत्यारे बाळगून जबरी चोरी, दुखापत, दंगा, खुनाचा प्रयत्न, हल्ल्याची पूर्वतयारी, घरात अनधिकृतरित्या शिरून दुखापत करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, खंडणी मागणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे यांसारखे २०११ पासून सराईत गुन्हेगार कपाळ्या याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले. आकाश उर्फ कपाळया राजू काळे (वय २७, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे. बुधवारी (दि. १३) त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.















