न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अभियान राबविणेकरीता केंद्र शासनाने मान्यता दिलेली असून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.ची स्थापना दि.१३ जुलै २०१७ रोजी करणेत आलेली आहे.
केंद्र शासनाकडे सादर केलेल्या स्मार्ट सिटी प्रपोजलची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत हाती घेणेत आलेली असून स्मार्ट सिटीचे पॅन सिटी कामकाजाअंतर्गत महापालिका क्षेत्रात Start- Up Incubation Centre प्रकल्प हाती घेणेत आलेला आहे. यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या संचालक मंडळाने ठराव क्रमांक १२४(८)/१९-२०, दिनांक १९/०७/२०१९ अन्वये मान्यता दिलेली असून यासाठी सामंजस्य करार (MoU)करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांना दिलेले आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष उद्देश वहन समिती (SPV) स्थापन करण्यात येईल. या विशेष उद्देश वहन समिती (SPV)च्या संचालक मंडळामध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचे अधिकारी, पदाधिकारी यांचा समावेश असेल. या प्रकल्पाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर रिसर्च ऍण्डडेव्हलपमेंट इन्स्टिटयूट आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचेमध्ये दि. १७ सप्टेंबर २०१९ रोजी सामंजस्य करार (MoU)करण्यात आलेला आहे.
या प्रकल्पांतर्गत Incubation Centre हे नव्याने उद्योग/व्यवसायिक स्थापन करणेसाठी आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन व जागाIncubation Centre मार्फत नवोदित उद्योजकांना पुरविण्यात येतील व ज्यामुळे शहराच्या परिसरातील उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करेल. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी. लि. मार्फत सदरचे Incubation Centre निर्माण करणेसाठी निधी पुरविणार असुन स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये सदरचा प्रकल्पासाठी रक्कम रुपये पाच कोटी इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. त्यामधुन आवश्यकतेनुसार निधी पुरविण्यात येईल.
ऑटो क्लस्टर रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट मार्फत प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे दैनंदिन कामकाज तसेच व्यवस्थापन यासाठी जबाबदार राहतील. सदर प्रकल्पासाठी स्थापन करणेत येणा-या विशेष उद्देश वहन (SPV) चे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी,पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. हे राहतील. सदरचे विशेष उद्देश वहनास (SPV) त्रयस्थ संस्थेमार्फत सहाय्य केले जाईल. ही त्रयस्थ संस्था विविध सेवा म्हणजेच कार्यक्रमांचे आयोजन, कार्यपध्दती, कौशल्य विकास व क्षमता बांधणी इत्यादीची आखणी करणेकामी सेवा पुरवेल. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी संयुक्तपणे नवोदित तयार होणारे उद्योजक यांना प्रशिक्षण, शासकीय योजनांची माहिती, उत्पादन तयार करणेकामी चाचणी व गुणवत्ता इत्यादीबाबत सुविधा उपलब्ध करणे व याकामी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करणेकामी नियोजन करणे. सद्य:स्थितीत ऑटो क्लस्टर येथे पहिल्या मजल्यावर या प्रकल्पासाठी ३०००Sq.Ft. जागा तसेच २४Incubation Start-up ची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीमध्ये१२ Incubation Start-up ची नेमणूक करण्यात आलेली असून भविष्यकाळात त्यांची छाननी होऊन पुढील मदत देण्याचे प्रस्तावित आहे.
उपरोक्तनुसार पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचे संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दि.१४ नोव्हेंबर २०१९ रोजी Incubation Centre चे उद्घाटन समारंभ श्रावण हर्डीकर- आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास किरण वैद्य मॅनेजिंग डायरेक्टर, ऑटो क्लस्टर ऍण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, चिंचवड, प्रदीप भार्गव – प्रेसिडेण्ट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, प्रशांत गिरबाणे डी.जी., मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, नाना काटे संचालक, पीसीएससीएल तथा विरोधी पक्षनेता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सचिन चिखले संचालक, पीसीएससीएल तथा मनसे गटनेते, प्रवीण तुपे सहशहर अभियंता, वि/यां, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निळकंठ पोमण सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पीसीएससीएल तथा मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, दिलीप गावडे सल्लागार, ऑटो क्लस्टर, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर, आभार केपीएमजी संस्थेचे संचालक राजा दव्वा यांनी केले.


















