न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापौर, उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार येत्या सोमवारी (दि. १८) रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.















