न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०१९) :- उच्च शिक्षित पत्नीने लष्करात सेवेत असलेल्या पतीला विष देऊन ठार केले. शीतल संजय भोसले आणि योगेश कदम अशी या दोघांची नावं आहेत. वाकड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. संजय भोसले असं खून झालेल्या पतीचं नाव आहे. ते भारतीय लष्करात कार्यरत होते. संजय आणि शीतल यांना दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शीतल आणि तिचा प्रियकर योगेश कदम (वय-२९) हे दोघे गेल्या दोन वर्षापासून एकमेकांवर प्रेम करत होते. योगेश शीतलच्या घरासमोरच रहात होता. मृत्यू झालेले संजय हे आसाम येथे देशसेवेसाठी कार्यरत होते. त्यामुळे ते सहसा काही महिन्यांनी घरी परतत. परंतु, संजय यांना योगेश आणि पत्नी शीतल यांच्या प्रेम प्रकरणाची चाहूल लागली होती. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले होते.
सात दिवसांनी खुनाचा गुन्हा उघड झाला. दरम्यान, शीतल यांना दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर हे करत आहेत.















